MPSC Rajyaseva Prelim Day Process in Marathi – MPSC Material

[ad_1]

राज्यसेवा पूर्व परीक्षा ही दोन पेपरांची सकाळ ते संध्याकाळ या वेळेत होते. सकाळी पहिला सामान्य अध्ययन पेपर १ असतो आणि नंतर मधली सुट्टी असते आणि दुपारच्या सत्रात सामान्य अध्ययन पेपर २ असतो ज्यांना उमेदवार CSAT चा पेपर म्हणतात. हे सर्वाना माहिती आहे.

(नोट : हाल तिकीट वरील सूचना जरूर वाचा. त्यात याहून जास्त आहेत, पण यात आहे ते तिथे सांगितले असेलच असे नाही.)

तर, तुम्ही जेव्हा केंद्रावर जाल तर एकतर आत घेणार नाहीत किंवा जर मोकळे असेल तर आत घेतील पण वर्गात जाऊन देणार नाहीत. बाहेरच किंवा कधी कधी आत तुमचे परीक्षेचे क्रमांक लावलेले असतात त्यातून नीट लिहून किंवा बघून पाहिजे त्याच वर्गात जा. क्रमांक जिल्ह्यानुसार असतात जसे तुम्ही ठाण्याला जाणार असाल तर परीक्षा क्रमांकाच्या पुढे TH असेल. तसेच तुम्ही ज्या जिल्हा केंद्रावर जाणार तिथली वेगळी अक्षरे असणार.

तर, केंद्रात प्रवेशाची वेळ पेपर च्या अर्धा तास अगोदर असते. म्हणजे जर पेपर १० वाजता सुरु होणार असेल तर ९:३० ला वर्गात प्रवेश दिला जातो. वर्गात गेल्यावर जे पेपर ला आवश्यक समान आहे ते आत बसण्याच्या ठिकाणी घेऊन जा आणि बाकीचे ज्यात काही समान आणले असेल ते वर्गाच्या बाहेर किंवा वर्गाच्या आतच पण सर्वांच्या पुढे ठेवायला लावतात ते सांगितल्यावर ठेवा. त्यामुळे परीक्षेला जातांना फक्त आवश्यक समान घेऊन जा. ज्यात हाल तिकीट, ओळखपत्र आणि त्याचे दोन झेरोक्स (आधार किंवा PAN कार्ड न्या. इतर Voter ID इत्यादी ज्यावर फोटो पाहिजे.), २-४ काळे बॉल पेन आणि साधे मनगटावरचे घड्याळ घेऊन जा. (घड्याळे सर्व वर्गात असतीलच असे नाही). हे सर्व अती आवश्यक आहेत बाकी काही घेऊन नाही गेले तरी चालेल. बाकी रिकाम टेकडे पण जाऊ शकता वरील सर्व खिशात घेऊन. बाकी Mobile असतात सर्वांकडे ते बाहेर ठेवावे लागतात. तर Bag बरोबर असेल तर ठीक आहे रिकामी गेला असाल तर Mobile बंद करून Condition नुसार तुम्हाला Mobile ठेवायला लावतील. त्यामुळे काही महागडी वस्तू घेऊन जाऊ नका. त्याला काही होणार पण, तुमचे त्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते. बाकी लेट गेले १० वाजेपर्यत किंवा १०:१५ पर्यंत तरी आत घेतले जाते पण सर्वच ठिकाणी घेतील याची शाश्वती नाही. त्यामुळे, केंदावर वेळेवर जा.  ९ वाजेपर्यत ठीक आहे. पेपर १ सावकाश सोडवा. (कासवासारखा नाही.) पेपर २ ला वेळ किमती आहे याचे लक्ष असुदे.

वर्गात गेल्यावर पहिल्यांदा सूचना दिल्या जातील किंवा नाही हे त्यांच्यावर. तुम्हाला नंतर OMR Sheet दिली जाईल त्ती नीट बघून घ्या. व्यवस्थित नसेल तर बदलून घ्या. चांगली असेल(असतेच..) त्यावर काही महत्वाची माहिती भरायची असते काळ्या पेनाने. त्यात परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, पेपर संकेतांक आणि सही करा ही सर्व माहिती हाल तिकीट वर असते. इथे बैठक क्रमांक अचूक भरा आणि त्याचे गोळे पण अचूक भरा(इथे खूप मुले चूक करतात तर तुम्ही ती करू नका.) OMR Sheet ही mpscmaterial.com च्या HomePage वर उपलब्ध आहे ती बघून घ्या. खूप वेळा पेज वर पोस्ट केलेली आहे.

त्या नंतर प्रश्नपत्रिका काही वेळ अगोदर येतात त्या सीलबंद पाकेट मध्ये असतात आणि त्यातील प्रत्येक प्रश्नपत्रिकेला सील असते. ते सर्व बघून कोणत्याही दोन उमेदवारांची सही घेतली जाते की सर्व काही ठीक आहे. त्यानंतर त्या सर्वांना वेळेआधी देतात. त्यावेळेत प्रश्नपत्रिकेची माहिती असेल ती OMR Sheet  वर टाकून घ्या. त्यात अचूक प्रश्नपत्रिकेचा क्रमांक, सेट कोणता आहे (A,B,C,D) या पैकी असेल त्यामुळे पुढचा कोणता गोल करतो तेच बघून नका करा. त्याला आणि तुम्हाला प्रश्न सेम असतील पण त्याचे प्रश्नाचे क्रमांक वेगळे असतील. त्यामुळे सर्व माहिती अचूक भरा. जेव्हा पेपर चालू होतो पेपर चा सील तोडा. काहीएक जण प्रश्नपत्रिका दिल्याबरोबर तोडतात तर काही एक पाने उघडून बघतात.

पेपर च्या वेळेत किंवा पेपरच्या सुरवातीला हजेरीसाठी सही करावी लागते. त्यात तुम्हाला प्रश्नपत्रिका क्रमांक आणि उत्तरपत्रिका क्रमांक टाकून सही करावी लागते तिथे पण अचूक माहिती भरा आणि सही करा.

पेपर चालू झाला आणि संपला हे कळत नाही, फक्त अभ्यास झालेला पाहिजे नाहीतर वेळ संपणार नाही. परीक्षा संपण्याच्या पंधरा वीस मिनिटे आधी किंवा दर अर्ध्या तासाला ठोके पडतात. हे सर्व टाळायचे असेल तर नक्की एक मनगटाचे घड्याळ किंवा नुसते तुटलेले बेंच वर ठेवायला घड्याळ घेऊन जा. शक्यतो ते बेंच वर ठेवू शकता. इतर Digital Watch किंवा Band घेऊन जाऊ नका.

पेपर ची वेळ संपल्यावर एक –दोन मिनिटे प्रश्न किती सोडविले ते मोजण्यासाठी आणि उत्तरपत्रिकेत नमूद करण्यासाठी वेळ दिला जाईल तर ते प्रश्न अचूक मोजा आणि अचूक नमूद करा.

हे सर्व झाल्याच्या नंतर व्यवस्थित उत्तरपत्रिकेचा भाग एक फाडून ठेवा आणि जमा करतांना तो द्या. तुमच्याकडे उत्तरपत्रिकेचा भाग २ आणि प्रश्नपत्रिका उरेल ती तुम्ही घरी आणायची असते आणि त्यात तुम्ही टिक केलेली उत्तरे कार्बन मुळे पार्ट २ वर छापून आलेली असतात ती घरी येऊन मोजू शकता. हे मार्क मोजणे वैगरे जेव्हा पहिली उत्तरतालिका येईल तेव्हाच करा आणि व्यवस्थित करा. आणि पार्ट २ उत्तरपत्रिका जपून ठेवा निकाल लागेपर्यंत. तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला किती गुण पडले हे तुम्हीच बघू शकता MPSC सांगणार नाही. त्यांना माहिती असते तरी पण ते सांगत नाही त्यामुळे तुम्ही पास झाले की नाही हे फक्त परीक्षा क्रमांक वरून निकाल आल्यावर कळेल. तुमचे अंतिम मार्क किती पडले हे अंतिम उत्तर तालिका येईल तेव्हा कळते.

(नोट : हे लिहित असतांना आज आयोगाची सूचना आलेली आहे की काही एक माहिती निकालाच्या नंतर उपलब्ध करून देण्यात येईल. “२. निकालाकरिता गृहीत धरलेले एकूण गुण” म्हणजे काय हे समजले नाही. तुमचे की सर्वांचे ? निकाल आल्यावर कळेल.)

परीक्षा झाल्यावर कुठे भटकत फिरू नका, घर गाठा. गर्दी नसणार लोकल वैगरे ला , बस ला असू शकते. बाकी मला सगळीकडचे माहिती नाही. मुंबई, नवीमुंबई आणि ठाणे-पालघर चे सांगू शकतो. इतर दिवशी काय गर्दी असते हे यांना माहिती आहे.

मला नाही वाटत इथपर्यंत कोणी वाचले असेल… खूप मोठी पोस्ट झालेली आहे.

या सर्व कार्यक्रमात थोडे फार बदल असतील कारण कोविड आहे. तर परीक्षेच्या सोबत तुमच्या सुरक्षेची पण काळजी घ्या. तुम्हाला कोरोना असेल तर ते तिथे सांगावे लागेल त्यांसाठी वेगळी रूम असेल. आणि तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण घ्या. नेहमी चुका वैगरे तुमच्याकडूनच होतील असे नाही. नाका-तोंडावर मास्क नेहमी असावा आणि चुकूनही तोंडात किंवा नाकात किंवा डोळ्यांत हात घालू नका. COVID पासून वाचण्यासाठी: आयोग तुम्हाला कीट देईल त्याचा वापर करा. नाका-तोंडावर मास्क नेहमी असावा आणि चुकूनही तोंडात किंवा नाकात किंवा डोळ्यांत हात घालू नका. शक्य असेल तर नक्की Face Shield घालून जा त्याने Almost Spread होणार नाही. एक फूस-फूस करणारी सॅनिटीझर ची बाटली जवळ असुद्या. जेव्हा कधी नाका- डोळ्याला हात लावायची गरज पडली तर पहिले हात स्वच्छ सॅनिटीझ करा नंतरच गरज असेल तर हात लावा. बाहेर काही खाऊ पण नका आणि दुसरे बोलायला मास्क काढतात म्हणून तुम्ही पण काढू नका. बाकी खूप सारे तुम्हाला माहिती असेल.

[ad_2]

Source link